रेल्वे प्रवासात खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगा: एका प्रवाशाचा अनुभव
रेल्वे प्रवासात खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगा: एका प्रवाशाचा अनुभव
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून नागपूरकडे तामिळनाडू एक्सप्रेस (गाडी क्र. १२६२२) मधून प्रवास करत असताना, १ जुलै रोजी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना एक वाईट अनुभव आला. आम्ही प्रवासात जेवणाची ऑर्डर दिली आणि अवघ्या दहा मिनिटांत जेवणही मिळाले. एका व्यक्तीने IRCTC चे ओळखपत्र घालून ऑर्डर घेतली आणि आम्ही त्याला ऑनलाइन पैसे दिले. पण जेवण उघडताच, त्यातून दुर्गंधी येऊ लागली. केवळ मलाच नाही, तर इतर प्रवाशांनाही असेच खराब जेवण मिळाले होते. आम्ही तात्काळ याची तक्रार 139 रेल्वे हेल्पलाईन नंबर केली मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही..
आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि ट्रेनच्या पॅन्ट्री मॅनेजरशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, रेल्वेमध्ये तयार होणारे जेवण हे पॅन्ट्रीतून येते आणि आम्ही जे जेवण घेतले होते, ते त्यांचे नव्हते. ते म्हणाले की, काही लोक रेल्वे स्थानकांवरून ट्रेनमध्ये चढतात आणि स्वतःला IRCTC चे कर्मचारी भासवून प्रवाशांना बाहेरचे जेवण विकतात. हे जेवण अनेकदा निकृष्ट दर्जाचे असते.
या अनुभवातून आम्ही शिकलो की, प्रवासात जेवण घेताना आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. बाहेरचे किंवा अनधिकृत व्यक्तींकडून जेवण घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की, रेल्वे प्रवासात जेवण घेताना नेहमी रेल्वेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच घ्या. अनधिकृत विक्रेत्यांच्या जाळ्यात फसू नका. आम्ही फसलो, तुम्ही फसू नका.
सावध राहा आणि सुरक्षित प्रवास करा.
#IRCTC #new delhi #railway
Be careful about food and drink during train journey: A passenger's experience
While travelling from New Delhi Railway Station to Nagpur in Tamil Nadu Express (train no. 12622), my colleagues and I had a bad experience on July 1. We ordered food on the train and received it within ten minutes. A person took the order by showing his IRCTC ID and we paid for it online. But as soon as we opened the food, it started smelling bad. Not only me, other passengers also had similar bad food. We immediately complained about it on the railway helpline number 139 but there was no response.
We tracked down the person and contacted the train's pantry manager. Then he gave us some shocking information. He explained that the food prepared in the train comes from the pantry and the food we had eaten was not his. He said that some people board the train from the railway stations and sell outside food to the passengers by posing as IRCTC employees. This food is often of poor quality.
From this experience, we have learned that we should be very careful while eating food during the journey. Eating food from outside or unauthorized persons can be dangerous. Therefore, I strongly request all the citizens that while eating food during the train journey, always eat from authorized railway employees. Do not fall into the trap of unauthorized vendors. We were fooled, do not be fooled.
Be careful and travel safely.
#IRCTC #new delhi #railway
No comments